LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Manogat

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
डोक्यात विचार म्हणून रात्रीला झोप कमी
आपलं पण वाजेल नाण हिच एक हौस मनी
लाखांची स्वप्न पाहतोय खिशात जरी रोख कमी
सुखाचे दिवस येतील देतो स्वतः रोज हमी
खूप जनी आल्या नी गेल्या आयुष्यात
पाहिजे होती खरी तेव्हा सोडलेली त्यांनी साथ
दोष नाही देत कोणा माणसाचा मूळ स्वभाव गरज भागली की शोधतात नेहमी दुसरी वाट
बंगला,कार,एसी हवंय पाहिजे तशी वाटतं बोलायला बरं पण मागे किती बीटी
मेहनतीचा दर महिना न चुकता भरतोय हफ्ता तरी नाही लागली मला अजून सुखाची ती भिषी
हातात वेळ कमी
जेवढं जमतंय पटपट करणारे
कल्पना केली तरी अंगावर येतात शहारे
सर्वात मोठं दुःख या शिवाय दुसरं नसणारे की
डोळ्याने आई वडिलांना होताना बघणं म्हातारे
होते याची जाण तेव्हा उशीर असतो झालेला
घरचा करता खांद्यावरती जबाबदाऱ्या आलेल्या
चेहऱ्यावरील हास्य फक्त देखाव्यासाठी बाकी बाहेरील देह हा तर नावापुरता राहिला
मी रॅप नाही लिहीत ही तर खरी माझी व्यथा
झिझलो तरी पण चालतोय जणू काही बाटा
गाठायचा शिखर पण पाय जमिनीवर लोकांचा विश्वास जिंकून जणू काही टाटा
धरलाय वेगळा हा रस्ता तर ४ लोकं बोलणारच
खेकड्याची जात मग पाय तुझे ओढणारच
आजूबाजू असुदेत कितीपण चिखल पण वेळेवर त्यातूनच कमळ तर फुलनारच

मी राहिलोय त्या झोपडीत मी पाहिलीय ती चाळ
आज गच्चीवरून बघतो मी होताना सकाळ
मी पण जगतोय माझ्या आईसाठी जसा divine
तू तर विझलेला दिवा जणू दिपक कलाल
हे गाणं पहिली लस दुसरा डोस अजून बाकी आहे
कळेल कोण डॅडी इथे चुकीला ना माफी आहे
गाढवांच्या शर्यतीत नव्हतो आधीपासून इथे स्पर्धा चालू खरी स्वतःशीच आहे
वाटतं वाईट काय,लोकांना कला माहीत नाही
नातेवाईक बोलतात पोरगा कामावर का जाईत नाही
वाटतं बरं जेव्हा आई फोनवर विचारते टीव्ही वरती मुलाला माझ्या तुम्ही पाहिलत का?
लेखणीतून जगण्याला मिळाला अर्थ मी जो घालवला वेळ नाही गेला तो व्यर्थ
ज्यांनी पाठीमागे बोलून मला केलेलं ब्लॉक आज स्वतःहून जाऊन मला करतायत सर्च
इथे कोण नाही कोणच लोणचं प्रविणचं
दुसऱ्यांची लाल मेंदीच्या कोनचं
करतात ऐकून एका दोनच यांना फाट्यावर मारून मी करतो मनचं
जीवनाला मिळाला हा नवीन आकार जेव्हा सोडलं मी करणं ४ लोकांचा विचार,नसतात दुःखात,त्रासात ह्यातले कोणी सुद्धा एक जेव्हा खराखुरा पाहिजे असतो आपल्याला आधार
थोडंसं पाणी अडवू शकता पण सागराला नाही
हा तर ग्रँड प्रीमियर अजून फिनाले झाला नाही
मी तर दशरथ मांझी तोडून डोंगर बनवतोय हा रस्ता
बांधून दुसऱ्याकडून घेतला अकबर ताज वाला नाही
जुळवायची पत्रिका ज्या वयात मी जुळवतोय यमक
हिप हॉप पहिली गरज त्याच्याशिवाय नाही जमत
बनायचंय सर्वांनाच तारा इथे गर्दीतून निघून
मी तर ध्रुव तारा माझी वेगळी असेल ओळख
ना भणक
चालायचय अजून बरंच
बोलायचं खूप आहे म्हणून नाही ठेवला
सारखं स्वतःला सिद्ध करणं मी दिलं सोडून भावा माणूस आहे मी ना प्रमेय पायथागोरस
मध्यमवर्गीय जन्मलो तर गरिबितच अंत का?
पैशासाठी धावपळ मग मनामध्ये खंत का?
द्यायचे प्रवचनातून उत्तरं साऱ्यांची आज देतोय रॅप मधून मी कलियुगी संत हा
Buntay बच्ची bummay
हे ऐकतायत जे नाही खरं आहे
मी बोलतोय जे पण काही तुझ्या कानासाठी बरं आहे
करत राहीन सदा जणू कृष्णेचा प्रवाह हे बाकी रॅपर पावसाळा पूर्ताचे छोटे झरा आहे
झगामगा गाण्यामध्ये मला नाही शोभत
धावपळ चालू रोज ध्येय माझं शोधत
वाटते भीती रोज उद्या झालो कधीं मोठा तेव्हा आई वडील तुम्ही असाल का माझ्या सोबत?
प्रत्येक शब्दात माझ्या जीव
श्रेय रक्तरुपी शाहीला
हिप हॉप माझा श्वास
कलेला जन्म वाहिला

WRITERS

A JIT

PUBLISHERS

Lyrics © O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

LyricIQ Analysis

Top Emotion

Sadness

Sentiment
Thumbsup IconThumbsdown Icon
Theme

None