दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
हो वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी
वाट चुकणार नाही, जीवनभर तुझी
एक तू मित्र कर, आरशासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
आत्महत्याच करणार नाही कोणी
आत्महत्याच करणार नाही कोणी
मित्र असला जवळ जर, मनासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
ओ का उगा हिंडतो, देव शोधायला
का उगा हिंडतो, देव शोधायला
मित्र आहे जवळ, मंदिरासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
ओ दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
दृष्ट लागू नये, वेदनेची तिला
दृष्ट लागू नये, वेदनेची तिला
हो मित्र डोळ्यामध्ये, काजळासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
हो दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
जाळताना मला, देह ठेवा असा
हो जाळताना मला, देह ठेवा असा
हात खांद्यावरी, टाकल्यासारखा
हात खांद्यावरी, टाकल्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा