आज आहे सखे निशी गंधास गंध
आज आहे सखे निशी गंधास गंध
श्वसनाचा प्रबंध तुझ्या माझ्यात ग
आज आल्यात ग पावसाच्या सरी
आज आल्यात ग पावसाच्या सरी
भावनेच्या भरी तुझ्या माझ्यात ग
आज नाही सखे येत कोणी दुजे
आज नाही सखे येत कोणी दुजे
नाही माझे तुझे तुझ्या माझ्यात ग
आज पाहू नको विस्मयाने अशी
आज पाहू नको विस्मयाने अशी
प्रीत आहे निशी तुझ्या माझ्यात ग
प्रीत आहे निशी तुझ्या माझ्यात ग
प्रीत आहे निशी तुझ्या माझ्यात ग