LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Vighnaharta Bappa Morya

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
सोनियाचा दिस आज
राहो माझ्या स्मरणात
परिसाचा स्पर्श होई
येता तुझ्या चरणास
चरणाशी वाहे तिर्थ
त्यास अमृताची गोडी
नैवैद्याचे ताट जणु
उभ्या जन्माची शिदोरी
ऐसा दाता तु जगाचा
लंबोदर नाव तुझे
ज्याच्या मनी आहे भक्ती
त्याच्या ठायी भाव तुझे

तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पामोरया
तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पा मोरया

दारी येता तु गणराया
क्षण आला आनंदाचा
दारी येता तु गणराया
क्षण आला आनंदाचा
आसमंती नाद हा घुमला
तुझा मोरया
हाक देता धावणारा
नवसाला पावणारा
पाठी राखा तू सकलांचा
तूच मोरया तूच मोरया
तहानल्या या डोळ्यात
साठवले रूप तुझे
कुपा तुझी राहो सदा
हेच मागणे माझे

तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पामोरया
तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पामोरया

दुःखे सारी तारणारा
सुखमय तू किनारा
दुःखे सारी तारणारा
सुखमय तू किनारा
पाठीवरती भार सारा
तुझ्या मोरया
मनाशी तू बोलणारा
ईच्छा सारया जाणणारा
वाट दाखवीस कलांना
तूच मोरया तुच मोरया
ऐसा दाता तु जगाचा
लंबोदर नाव तुझे
ज्याच्या मनी आहे भक्ती
त्याच्या ठायी भाव तुझे

तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पा मोरया
तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पा मोरया
तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पा मोरया
तु कर्ता करविता
विघ्नहर्ता बाप्पा मोरया

WRITERS

VIPUL NAREDNRA SHIVALKAR

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other