आज या एकान्त काली मीलनाची पर्वणी
आज या एकान्त काली मीलनाची पर्वणी
दूर का तू साजणी दूर का तू साजणी
सोड खोटा राग रुसवा हा बहाणा काय फसवा
सोड खोटा राग रुसवा हा बहाणा काय फसवा
लाजरी मूर्ती तुझी ही अधिक वाटे देखणी
आज या एकान्त काली मीलनाची पर्वणी
दूर का तू साजणी दूर का तू साजणी
दो जिवांच्या संगतीने फुलून येती फूल पाने
दिवस होई रात्र येथे रात्र वाटे चांदणी
आज या एकान्त काली मीलनाची पर्वणी
दूर का तू साजणी दूर का तू साजणी
हे गुलाबी धुंद कोडे बोल थोडे हास थोडे
स्वप्नवेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी
आज या एकान्त काली मीलनाची पर्वणी
दूर का तू साजणी दूर का तू साजणी