LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Ghanshyam Sundara

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा
श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी
वनमाळी उठिं लवकरि वनमाळी
उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा
आ आ आआ

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
उठिं लवकरि वनमाळी वनमाळी
उठिं लवकरि वनमाळी
उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा
सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी(आआआ)
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं(आआआ)
यमुनाजळासि जासी मुकुंदा
यमुनाजळासि जासी मुकुंदा दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी वनमाळी
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला

WRITERS

Shahir Honaji Bala

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other