सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान
सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान
पाखरांच्या थव्यावानी भीर भीर मन
सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान
किती जपावी बुरात कळा जीव घेणी
मुक्या डोळ्यांच्या तळ्यात आटलं पाणी
किती जपावी बुरात कळा जीव घेणी
मुक्या डोळ्यांच्या तळ्यात आटलं पाणी
जीव जडल्यागत होत कसं याच धन
सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान
काय द्याव त्याव पाणी सुख झाल वांज
ऐन मोहाच्या घडीला आली दारापुढं सांज
विटाळल्या दुःखाला या मूठ द्यावी लेकरांन
सुन्या सुन्या काळजाचं सून सून रान
पाखरांच्या थव्यावानी भीर भीर मन