श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ।
अनाथांचे नाथ, भक्तांचे गुरू समर्थ
दिनांसाठी घेई ,अवतार गुरू समर्थ ।
अनाथांचे नाथ, भक्तांचे गुरू समर्थ ॥धृ॥
दावुनी चमत्कार,चकित केले भुवरी
भक्त अनुभवी, परब्रह्म आहे तूं ची
चराचर व्यापूनी, अवघा उरलासी ।
अनाथांचे नाथ, भक्तांचे गुरू समर्थ ॥धृ॥
सर्वची करूनी, अकर्ता तूं होसी ।
न शिकविता , शिकवी सर्व काही ।
दृष्टी न पाही पुर्ण व्यापक तू ही ।
अनाथांचे नाथ, भक्तांचे गुरू समर्थ ॥धृ॥
तुझे वर्णन कोण, त्रिभुवनी करिल।
असे जे चारी वेद, न सांगती तुझे रूप
नेती नेती म्हणुन, तयांनी धरीले मौन ॥४॥
अनाथांचे नाथ, भक्तांचे गुरू समर्थ ॥धृ॥