स्वामींच्या प्रतिमेत , साक्षात चैतन्य ,
दर्शन घेताच उमजले , अखंड सत्य
नयन भरूनी वाहे ,आनंद अश्रू धारा,
ह्रदयात अनुभव ,श्री स्वामी समर्थां ॥
मिटली सर्वची जी ,दु:खांची व्यथा ,
प्रतिमेत दिस तसे , स्वामींची लीला ॥
प्रतिमा नव्हे ते , असे निज स्वरूप ,
हेची सत्य असे , स्वामी भगवान ,
भव सागरातूनी , करी जनास पार ॥
शुद्ध भाव माझा , असे स्वामी चरणी ,
कृपा आशीर्वाद , मिळे त्याच क्षणी
अशी आहे माझी , सद्गुरू माऊली ,
ध्यास लागता , मिळवी स्वस्वरूपी
प्रकृतीचा संसार , भ्रमाचा बाजार ,
सुखाचे आशेने , दुःख भोगी निरंतर
स्वामींचा वरद हस्त , दु:ख भ्रम नाश ,
भव सागरातूनी , स्वामींनी केले पार
स्वामींच्या प्रतिमेत ,साक्षात चैतन्य
दर्शन घेताच उमजले , अखंड सत्य