LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Aarti Saprem Jai Jai Dashavatar Aarti

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटिं नाना भक्त संकटिं नाना स्वरूपीं
स्थापिसि स्वधर्म दयाळा स्थापिसि स्वधर्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी
हस्त तुझा लागतां हस्त तुझा लागतां
शंखासुरा तुझा वर देसी शंखासुरा तुझा वर देसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी
प्रल्हादाकारणें प्रल्हादाकारणें
स्तंभीं नरहरि गुरगुरसी स्तंभीं नरहरि गुरगुरसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी
वामनरूप धरुनी वामनरूप धरुनी
बळिच्या द्वारीं तिष्ठसी बळिच्या द्वारीं तिष्ठसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला
सहावा अवतार सहावा अवतार
परशुराम प्रगटला परशुराम प्रगटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
मातला रावण सर्वां उपद्रव केला
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला
पितृवचनालागीं रामें वनवास केला
मिळोनि वानरसेना मिळोनि वानरसेना
राजा राम प्रगटला राजा राम प्रगटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले
गोपिकांचें प्रेम देखुनि गोपिकांचें प्रेम देखुनि
श्रीकृष्ण भुलले श्रीकृष्ण भुलले
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा
बहिरवि जान्हवी द्यावी बहिरवि जान्हवी द्यावी
निजसुखानंदाची सेवा निजसुखानंदाची सेवा
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

PUBLISHERS

Lyrics © Sentric Music

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other