फुलले-खुलले क्षण हे अंकुरले
केसरी आकाश झाले, नभ ही दाटून बरसले
कळकीत वाहे वारं, धुन ही अलगुज छेडिते
वाट ही झाली निराळी, दुःख सारे वाहिले
हे हसणे, लाजणे, मुक्या मनाचे बोलणे
लपणे जे मेघा पलीकडे, लोचणे दिसतात रे
क्षणात सारे उधाण वारे शिथिल होऊन जाती
नवे हे रंग करुनी दंग जुडती रेशिम गाठी
कळत-नकळत ह्रदयी अलगद जाती बिलगून नाती
बेल्हाड हे पाखरू हळूचं पाहते मी धरु
वाऱ्यालळी झुलते सारे निराळे तरु