LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Vitthal Bhaktigeet

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी
जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे
भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही
कंप का सुटावा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा

उजेडात होते पुण्य
अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे
कर्तव्याचे माप
दृष्ट दुर्जनांची कैसी, घडे लोकसेवा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा

स्वार्थ जणु भिंतीवरचा
आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते
आपुलीच वैरी
घडोघडी अपराधाचा, तोल सावरावा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा
देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा आता,
उघड दार देवा आता
उघड दार देवा आता,

WRITERS

Tradititional

PUBLISHERS

Lyrics © Universal Music Publishing Group

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other