LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Tap Tap Takit Tapa Chale

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप
सांगा पाहू हा कसला आवाज आहे तो
बरोबर घोड्यांच्या टापांचा
लहापणी प्रत्येकालाच वाटतं
घोड्यावर बसावं आणि टप टप टप टप
दूर कुठे तरी जावं राजा सारखं राणी सारखं
अहं राजपुत्र सारखं किंवा राजकन्ये सारखं
हं पण ते कुठे आपल्यला जमतं
मग कुणी काकाच्या पाठीचा घोडा करतं
किंवा कुणी दादाला वेठीला धरतं
किंवा कुणी हक्कानं मामाच्या खांद्यावर बसतं
आणि त्याचे बिचार्याचे केस धरून सुरु

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टप टप टप टप

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मागेच मान
उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मागेच मान
मधेच केव्हा दुडकत दुडकत
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टप टप टप टप

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा
नुसता त्याला पुरे इषारा कशास चाबुक ओढा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टप टप टप टप

पाच अरण्ये समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
पाच अरण्ये समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला आला
आला आला माझा घोडा
आला आला माझा घोडा सोडा रस्ता सोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा
टप टप टप टप टप टप टप टप
टप टप टप टप टप टप टप टप
टप टप टप टप टप टप टप टप
टप टप टप टप टप टप टप टप

WRITERS

DP

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other