एक पाऊल, एक चाहूल, एक अंदाज, एक हुरहुर...
लढून, मोडून, लंघून, जिंकून... उडते तेव्हा तुफान होते..
निळ्याशार अन धुंद नभाशी, गुजगोष्टी करते...
मी साऱ्या जगाची.. मी साऱ्या ताऱ्यांची..
मी माझ्या.. स्वप्नांची.. घेते भरारी...
मी साऱ्या जगाची.. मी साऱ्या ताऱ्यांची..
मी माझ्या.. स्वप्नांची.. घेते भरारी...
माझ्या नजरेमधली माझी दुनिया नवी-नवी
रंगवली मी, मला कितीदा, वाटे हवी-हवी
ओलांडून ह्या सगळ्या रेषा, आले मी आले
माझ्या दुनियेमध्ये आता माझी मुशाफिरी
निळ्याशार अन धुंद नभाशी, गुजगोष्टी करते...
मी साऱ्या जगाची.. मी साऱ्या ताऱ्यांची..
मी माझ्या.. स्वप्नांची.. घेते भरारी...
मी साऱ्या जगाची.. मी साऱ्या ताऱ्यांची..
मी माझ्या.. स्वप्नांची.. घेते भरारी...