LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Bhetali Tu Punha Duet Reprised Version

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
भेटली तू पुन्हा
पाहीले मला मजविना
धडधडे या उरी का तुला ही
बघ तु एकदा

एकदा तु पुन्हा छेड
माझ्या मना
एकदा मी पुन्हा राग
घेतो नवा
छंद तु माझा हो
मी तुझा सोहळा
गुंतलो मी जिथे त्या
तुझ्या गं लटा
भेटली तु पुन्हा
पाहीले मला मजविना

तु तोच मन वेधे
मी दिन तोच पाहे
तु आणि ही दुरी
का ओढ लागे तरी
ओढ लागे पुन्हा शोख
नजरा अश्या
बंदी व्हावे पुन्हा
दिलबरा तो कसा
साज तू माझा हो
बंदिशे मी तुझ्या
गुंतले मी जिथे त्या
तुझ्या रे अदा

भेटला तु पुन्हा पाहीले
मला मजविना
धडधडे या उरी का तुला ही
बघ तु एकदा

तु आज ही ल्याली, मी
माळलेली जाई
तु नाही जवळी
का जाईना
ही छवी?
जाईना ही छवी तु अशी दिलनशी
जाग या प्रीतीची रोखू
मी का किती
साथ तु माझी हो
मी तुझा सोबती
गुंतलो दोघे ही प्रीत
आहे खरी

भेटली भेटला, तु पुन्हा
तु पुन्हा
पाहीले मला मजविना
धडधडे या उरी का तुला ही
बघ तु एकदा
हो, मला ही बघ तु एकदा

WRITERS

Vinay Narayane, Vivek Deulkar

PUBLISHERS

Lyrics © MUSIC SERVICES, INC.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other