रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू
आमच्यासंगे बोला आता ढिश्यूमढिश्यूमढिश्यूम
हा हा हि हि हो हो आता तुमची गट्टी फु
आलं बाळ बारा वर्षे बोलू नका कोणी
चॉकलेटे नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी हं
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
सांगशील का माझ्या कानी अरे
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
आनंदी हा चन्द्र मुखाचा उदास का दिसला
राग तुझा कसला आमचा राजू अरे रे
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
बावन पत्ते बांधू वाडा शर्यत खेळू घोडा घोडा घोडा
घरादाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू बघा हो
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
चिमणी खाई मोती दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला
राग तुझा कसला आमचा राजू सोनूला
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला
आमचा राजु का रुसला आमचा राजू का रुसला