हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
दुष्काळाच्या साली मायचा आटला होता पान्हा
आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी घालून मले पाजत जाये
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
सुट्टीमधी जावा मी येत होतो घरी
उसंन पासंन आणून खाऊ घले नाना परी
सुट्टीमधी जावा मी येत होतो घरी
उसंन पासंन आणून खाऊ घले नाना परी
आरे करू नको घाई म्हणे पोटभर खाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
कन्यकाट्या येचायला माय जाय राणी
पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी
कन्यकाट्या येचायला माय जाय राणी
पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी
इचू काटा कुठल्याही मोजत नसे पाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
दारु पिऊन मायेले रोज मारे माझा बाप
थरथर कापे माय आन लागे तिले धाप
दारु पिऊन मायेले रोज मारे माझा बाप
थरथर कापे माय आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तिच्यामधी दिसते मले तवा माही माय
तवा माही माय तवा माही माय
तवा माही माय तवा माही माय