आवडती भारी मला माझे आजोबा
आवडती भारी मला माझे आजोबा
पाय त्यांचे थकलेले गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले ओटीवरी गीता गाती
आवडती भारी मला माझे आजोबा
नातवंडा बोलावून घोगर्याशा आवाजानं
सांगती ग रामायण मोबदला पापा घेती
आवडती भारी मला माझे आजोबा
रागे भरता बाबा आई आजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई कुटलेला विडा देती
आवडती भारी मला माझे आजोबा
खोडी करी खोडकर आजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर पोरांसंगे पोर होती
आवडती भारी मला माझे आजोबा
आवडती भारी मला माझे आजोबा