माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
न करी अव्हेरा पांडुरंगा नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
अनाथांचा नाथ होसी तू दयाळा
अनाथांचा नाथ होसी तू दयाळा
किती वेळोवेळां प्रार्थू आता
किती वेळोवेळां प्रार्थू आता नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
नामा म्हणे जीव होतो कासावीस
नामा म्हणे जीव होतो कासावीस
केली तुझी आस आता बरी नारायणा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा