प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "
वरदवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत
पराकोटींचे पराक्रमी योगी श्रीमंत
गर्जना घुमे नभी अन रात्र होई जागी
श्रीमानयोगी ते सिंहासनाधीश्वर
तेच रणाचे राजे अन तेच रणाचे ईश्वर
सनई चौघड्यातुनी घुमती एक एक हे एकच स्वर
शिवबा एकला छत्रपती बाकी सारे नश्वर
रौद्र रूप पाहुनी शिवबांचे यमराजाला कापरे फुटे
रोष पाहुनी छत्रपतींचा मृत्यूला थरकाप सुटे
समशेर तळपे शिवरायांची अन वीरत्वाची आग लागे
नजर पडे शत्रूवर अन शत्रूचा प्राण देह त्यागे
परम प्रखर तेजाने शिवाच्या सूर्य सुद्धा झाकल
शर्थ पाहुणी काळ ही मुजरा करण्यास वाकला
तेज पुंज तेजस्वी डोळे डोळ्यां मधे आग भडके
पोलादी छाती सिंहाचं काळीज काळजात भगवाच फडके
राज्य शिवबाचे हृदयावर आणि या त्रिलोकावर
मरण ही पेलून धरले ज्यांनी तलवारीच्या टोकावर
रांझ्याचा पाटील उभा फाडला औरंग्याचा माज गाडला
चुहा बोलुनी आलेल्या अफजल्याचा कोतळा काढला
सर कोणास येईल का त्या जगदंबेच्या भक्ताची
समशेरीला तहान जयांच्या गनिमाच्या रक्ताची
समुद्राच्या छातीवर भूमिपुत्राची छाप
सागराला धाक देई इंडियन नेवी चा बाप
जातीला नव्हता थारा नाही धर्माचा आंधळा खेळ
आठरा पगड जातिनीशी घातला स्वराज्याचा मेळ
इतिहासाच्या पानांची झाली कानभरणी
आला स्वराज्याला आडवा म्हणून कापला कुलकर्णी
बळीराजा तो शेतकऱ्यांचा रयतेचा अधिपती
लोककल्याणासाठी झाले शिवबा छत्रपती
धर्माच्या कंटकाना महाराष्ट्र धर्माची भीती
महाराष्ट्र धर्म वाढीविण्या झाले शिवबा छत्रपती
माझा राजा कसा सिंहासनी बैसला —४