LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Indradhanu

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

पाकळी पाकळी उमलून आली अशी
न कळे मन हे आवरून घेऊ कशी
माझे माझे नावे काही सांगे मलाच मी
गालावर लाज तनु मोहरे शहारुनी
नवी नवी होऊनि का भेटते मलाच मी

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

नवखे वाटते सारे ते तसेच जरी
लागते कसली हूर हूर गोड उरी
माझे मला अनोळखी भासे उगाच मी
कुणीतरी आज अशी ओढ नवी लावुनी
भुलवते पुन्हा पुन्हा हासते उगाच मी

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

WRITERS

AJIT PARAB, GURU THAKUR

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other