कुणी विठ्ठल म्हणे कुणी सावळा म्हणे
कुणी माधव म्हणे कुणी मुरली मनोहर
कुणी विठ्ठल म्हणे कुणी सावळा म्हणे (आ)
कुणी पांडुरंग कुणी कानडा (आ)
कुणी माधव म्हणे कुणी मुरली मनोहर (आ)
कोणते रे नाव तुझे कोणते रे गाव
कोणते रे नाव तुझे कोणते रे गाव
तुझी सारी उठाठेव आम्हा नसते रे ठाव
तुझी सारी उठाठेव आम्हा नसते रे ठाव
विठ्ठला पांडुरंगा कानड्या श्रीरंगा
विठ्ठला पांडुरंगा कानड्या श्रीरंगा
कुणी विठ्ठल म्हणे कुणी सावळा म्हणे
कुणी माधव म्हणे कुणी मुरली मनोहर
तुझ्या कपाळी बुक्या सम आभाळ भरुनी यावं
थेंब थेंब मायेन त्या भक्तीरूप ओले व्हावं
हो तुझ्या कपाळी बुक्या सम आभाळ भरुनी यावं
थेंब थेंब मायेन त्या भक्तीरूप ओले व्हावं
तुझ्या चरणी वाहण्या तुळशी परी रुजावं
मातीच्या कणा कणाला ओल्या अंकुराची हाव
विठ्ठला पांडुरंगा कानडया श्रीरंगा
विठ्ठला पांडुरंगा कानडया श्रीरंगा
कुणी विठ्ठल म्हणे कुणी सावळा म्हणे
कुणी माधव म्हणे कुणी मुरली मनोहर
कुणी विठ्ठल म्हणे कुणी सावळा म्हणे
कुणी माधव म्हणे कुणी मुरली मनोहर