LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Mala Pirtichya Jhulyat Jhulwa

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हं हं हं हं ज्वानी ऐन भरात आली
मस्त अंगुरी रात प्याली
मदनाची रूप सुंदरा
जणू इंद्राची अप्सरा
गुलजार नार देखणी
नखरेल चटकचांदणी
हेडं ढोलकीच्या नादानं
घुंगरू झालं बेभान
नाच नाचून आला गं थकवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
राया पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
राया पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा

हिला जोडींन मुंबईला फिरवा (हिला जोडींन मुंबईला फिरवा)
हो दाजी हिला जोडींन मुंबईला फिरवा (हो दाजी हिला जोडींन मुंबईला फिरवा)

मला जोडींन मुंबईला फिरवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
राया पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा

मी लाडाची तुमची मैना
मला बघून लाजतोय आईना
मी लाडाची तुमची मैना
मला बघून लाजतोय आईना
फसली नाही कधी कुणा
किती जिवांची केली मी दैना
अर्धी कच्ची मी कैरीची फोड
जरा आंबट जराशी गोड
हे फिरता फिरता तंद्रीत
हरवले मी गर्दीत
कुणी मेल्यांन मारला गं बट्टवा
आधी जाऊन
हो आधी जाऊन पोलीस बोलवा
आधी जाऊन पोलीस बोलवा
मग खुशाल पतंग उडवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा ना

वय माझं आहे साडेसोळा
आगापीच झालं मजून गोळा
वय माझं साडेसोळा
आगापीच झालं मजून गोळा
मी नशीला घोट प्याला
आन गांवभर बोभाटा झाला
मोरपिसाचं मऊ अंग
गाल गुलाबाचे गोरे रंग
हो भिजून गेले घामानं
लई मी झाले हैराण
तुमच्या एशीचं कुलिंग वाढवा

हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा (हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा)
हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा (हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा)
आन इश्काचा गुलकंद खिलवा (आन इश्काचा गुलकंद खिलवा)
हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा (हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा)
हो दाजी हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा (हो दाजी हिला पिरतीच्या झुल्यात झुलवा)
आन इश्काचा गुलकंद खिलवा (आन इश्काचा गुलकंद खिलवा)

मला जोडींन मुंबईला फिरवा
राया मला जोडींन मुंबईला फिरवा
राया आणा की माहिमचा हलवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
राया पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा
आन इश्काचा गुलकंद खिलवा

हिला इश्काचा गुलकंद खिलवा (हिला इश्काचा गुलकंद खिलवा)

आन इश्काचा गुलकंद खिलवा हो

WRITERS

MANDAR SHASHIKANT CHOLKAR

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist