LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Manus Manus

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
माणसांनी गजबजलेल्या या दुनियेत
माणूसपणाचा कुठे मागमूसही नाही
बहिणाबाईला हे सतत दिसत होत जाणवत होत
अप्पलपोटया दुनियेकडे बघून ती व्यतीत होत असे
तीला सात्विक संताप ही येत असे
माणसांची हाव कधी संपतच नाही
कितीही मिळाले तरी त्याची तृप्ती कशी ती होताच नाही
नियत हरवून बसलेल्या या माणसाला
बहिणाबाईने आपल्या तिखट शैलीने
असे काही झोडपलय
जणू तिच्यातमहिषासुरमर्दिनीच अवतरली आहे

माणूस माणूस
मतलबी रे मानसा
माणूस माणूस
मतलबी रे मानसा
तुले फार हाव
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
माणूस माणूस
मतलबी रे मानसा

मानसा मानसा
तुझी नियत बेकार
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
माणूस माणूस
मतलबी रे मानसा

भरला डाडोर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध

मतलबासाठी
मान मानूस डोलये
मान मानूस डोलये
मतलबासाठी
मान मानूस डोलये
मान मानूस डोलये
अरे इमानाच्यासाठी इमानाच्यासाठी
कुत्रा शेंपूट हालये
माणूस माणूस
मतलबी रे मानसा

मानसा मानसा
कधीं व्हशील रे मानूस
मानसा मानसा
कधीं व्हशील रे मानूस
लोभासाठी झाला
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस
माणूस माणूस
मतलबी रे मानसा

आईसनी रे लोकांचे
यवहार खोटे नाटे
यवहार खोटे नाटे
पाहीसनी रे लोकांचे
यवहार खोटे नाटे
यवहार खोटे नाटे
तवा बोरी बाभळीच्या
बोरी बाभळीच्या
आले अंगावर काटे
माणूस माणूस
मतलबी रे मानसा
मतलबी रे मानसा
मतलबी रे मानसा

WRITERS

BAHINABAI CHAUDHARY

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other