अग मनात भरलीस तू गावलाय आज रंग
जिथं तिथं दिसतीस तू येगळाच हा छंद
हसतंय लाजताय येडपीस येडं मला लावतंय रूप तुझं
उमलू दे कळी हि गालावर खळी ओढ लागली
मी तुझ्यावर जीव हरले ना मला कळे
गंध हा कोणता रे भास कि खरे
बरसून तू अशी ग ये घन आज दाटलंय
विसरून तू स्वतःला ये मन साद घालताय
उमलू दे कळी हि गालावर खळी ओढ लागली
तू तू रु तू तू तू रु रु रु रु रु रु
तू तू रु तू तू तू रु रु रु रु रु रु
मी तुझ्यामधी गुंतले रे भान ना उरे
हे दिसाच चांदणं रे का मला दिसे
ठाव तुझा तू मला ग दे आवताण धाडलंय
असं मला तू सपान दे धुमशान मातलंय
उमलू दे कळी हि गालावर खळी ओढ लागली