LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Sapan Tuza

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
सपान तुझं रातीला पडलंय
देखणं रूप डोळ्यात बसलय
धजतय ना भिजतय ना
खुदकन तू हसून हलकंचं
लाजून गालात
सपान तुझं रातीला पडलंयं
देखणं रूप डोळ्यात बसलय
हे हे

जोडू लागलं नातं तुझ्याशी
मिळू लागलं मन तुझ्याशी
धागा दोरा काही घावना तूच आता सांग
झोप नाही आता रातीला सूटलया भान
समजून घे पीरतीला जरा
धजतय ना भिजतय ना
खुदकन तू हसून हलकंचं
लाजून गालात
सपान तुझं रातीला पडलंयं
देखणं रूप डोळ्यात बसलय
हे हे

कस्तुरी ही दरवळे
श्वासामंदी आज रे
बंध रेशमी हे तुझ्याशी
शब्द का हे थांबले
व्हटामंदी सांग रे
बोलताना मी ही तुझ्याशी
थोडा थोडा जीव झाला हा
का रं हैराण
नाही नाही आता राहिलं
कशाचं बी ध्यान
समजून घे पीरतीला जरा

धजतय ना भिजतय ना
खुदकन तू हसून हलकंचं
लाजून गालात
सपान तुझं रातीला पडलंयं
देखणं रूप डोळ्यात बसलय
हे हे

WRITERS

Rahul Kale, Vijay Bhate

PUBLISHERS

Lyrics © IPRS, Sony/ATV Music Publishing LLC

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other