LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Manan kelay kahar

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
मनामंदी या सुटलंय माझ्या इष्काचं वार तुझं
तुझ्याचसाठी इंद्रधनु अन वादळ वारं तुझं
असं पिसाटलाय बघ झनानलाय उरी भिनलं जसं जहर
तुझ्या इष्काची आली लहर म्हनून या मनानं केलाय कहर

चांद फिरतंय धरतीभवती मन तुझ्यामागं फिरतंय
जीव होतंय खालीवरती जस तुझ्यासाठी झुरतंय
लपून छपून मन, प्रेम तुझ्यावरी करतंय
जगतंय तुझ्याचसाठी अन तुझ्यावरी मरतंय
तुला बघून हसनं भेटून मनाला आलाय बहर
तुझ्या इष्काची आली लहर म्हनून या मनानं केलाय कहर

बघूनी पिरेम तुझं, तुझ्या मनाचं हाल कळतंय
मग भेटायाला तुला, माझं मन हे तळमळतंय
भेटून तुला जरासं, प्रेम उरात सळसळतय
तू असता सोबत माझ्या, माझं जीवन दरवळतंय
तुझ्या दिलाची धडकन मी, तुझ्या मनानं माझं शहर
तुझ्या इष्काची आली लहर म्हनून या मनानं केलाय कहर

WRITERS

Yogesh Dawate

PUBLISHERS

Lyrics © O/B/O DistroKid

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other