LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Kuthla Rasta

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
कुठला रस्ता कुठली वळण
कसला हा अंधार

कसल्या भिंती कसलं घरटं
कसला हा संसार
कापरा वारा बेभान,
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटांवरती
देवाचे बी वारं,
झालं बंद आता देवा
कसला रं आधार

चालून थकलं पाऊल आता
थांबत मनात समद काही
उन्ह उन्ह झालं झाड पाखरांचं
सावली कुठच आज न्हाई
वनव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा
ठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा
जगण्या मरणाचा अवतार
कुठला रस्ता कुठली वळण,
कसला हा अंधार
कसल्या भिंती, कसलं घरटं
कसला हा संसार
कापरा वारा बेभान,
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटांवरती
देवाचे बी वारं
झालं बंद आता देवा
कसला रं आधार

जल्माची साऱ्या सांग कहानी
तळहाती तुटलेलं रेषा
फिरत्यात सारं नशिबाचा फेर
जगण्याची वनवनती भाषा
कळला ना पिरतीचा अर्थ का कुणा
हसण्यावर नसण्याचा सूड का पुन्हा
जगण्या मरण्याचा अवतार
कुठला रस्ता कुठली वळण,
कसला हा अंधार
कसल्या भिंती, कसलं घरटं
कसला हा संसार
कापरा वारा बेभान,
सारखा घाली थैमान रं
जगण्याच्या या वाटांवरती
देवाचे बी वारं
झालं बंद आता देवा
कसला रं आधार

WRITERS

SUMITRA

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other