LyricFind Logo
LyricFind Logo
Sign In
Lyric cover art

Ashtavinayak

Disate Majla Sukh Chitra Nave

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Share icon
Lyrics
आ आ आ आ
दिसते मजला सुखचित्र नवे
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मनभावना
शब्दाविना मनभावना
अवघ्याच मी तुज सांगते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागुन यावे आस ही माझ्या उरी
तुज संगति क्षण रंगती
तुज संगति क्षण रंगती
निमिषात मी युग पाहते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

स्वर्ग मिळे धरणीस जेथे रंग नवे गगनांगणी
सप्तसूरा लेवून यावी रागिणी अनुरागिणी
तुझियासवे सुख वैभवे
तुझियासवे सुख वैभवे
सौभाग्य हे नित मागते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते
दिसते मजला सुखचित्र नवे

WRITERS

ANIL - ARUN, SHANTA SHELKE

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other