द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठीशी बहीण
विचाराया गेली नारद म्हणून
बोट श्रीहरीचे कापले ग बाई
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदी बोलली हरीची मी कोण
परी मला त्याने मानली बहीण
परी मला त्याने मानली बहीण
त्रैलोक्य मोलाचे वसन दिली फाडून
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
प्रीती जी खरी ती जगाला भाविन
प्रीती जी खरी ती जगाला भाविन
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण